Ad will apear here
Next
छायाचित्रांमधून ‘हंपी’चे विलोभनीय दर्शन


चिंचवड (पुणे) : ‘वर्ल्ड   हेरिटेज’  चा  दर्जा  प्राप्त असलेल्या कला  व स्थापत्यशास्त्राचा  अपूर्व  संगम असलेल्या कर्नाटकातील  ‘हंपी’ चे विलोभनीय दर्शन  छायाचित्रांमधून घेण्याची संधी रसिकांना उपलब्ध झाली  आहे.  छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी 'हंपी'  येथे टिपलेल्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन १५ ते २० ऑगस्ट दरम्यान   चिंचवड  येथे  पु . ना.  गाडगीळ  अँड सन्स  या सुवर्णपेढीमधील  कलादालनामध्ये भरवण्यात येत आहे. यात ८० पेक्षा  जास्त   मोठया  आकारातील  छायाचित्र  पहावयास  मिळणार आहेत.

ख्यातनाम   चित्रकार रवी परांजपे  यांच्या  हस्ते  या प्रदर्शनाचे  उदघाटन  १५ ऑगस्ट  रोजी  सकाळी ११  वाजता  होणार आहे.  हे प्रदर्शन   सकाळी  ११ ते सायंकाळी  ८ पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले   राहील. 

सन १३३६ ते  १५६५ या सव्वादोनशे   वर्षांच्या  कालावधीमध्ये   वैभवशाली  असलेले  विजयनगरचे साम्राज्य   राक्षसतागडीच्या  लढाईत  पूर्णपणे नेस्तनाबूत झाले . अगणित संपत्तीची ६ महिने  लूट   झाली.  आताचे   कर्नाटकातील  ‘हंपी’   म्हणजे  मध्ययुगीन भारतातील   विजयनगर साम्राज्याची  राजधानी . कला  व स्थापत्य शात्राचा   अपूर्व  संगम ,  या भग्ननगरीला  १९८६ मध्ये  ‘युनेस्को’  ने  ‘वर्ल्ड   हेरिटेज’  चा  दर्जा दिला.   याच  विस्मयचकित करणाऱ्या ‘हंपी’  चे   छायाचित्रण   करून   भारताच्या  इतिहासातला  एक समृद्ध प्रदेश  पाहण्याची  संधी   चिंचवड मध्ये  उपलब्ध  झाली  आहे .  

संपर्क :
देवदत्त कशाळीकर  
९९२२५ ०१४०२
९८५०६० ०६२५
 www.devdattaphotography.com

प्रदर्शनाविषयी
दिवस : १५ ते २० ऑगस्ट
वेळ : सकाळी १० ते रात्री ८
स्थळ : पु . ना.  गाडगीळ  अँड सन्स  दालन

फेसबुक -

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZNZBF
Similar Posts
‘आधारकार्ड अभियाना’ची मोहिम महिनाभर वाढविण्याची मागणी पिंपरी : महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवसीय ‘आधार नोंदणी व दुरुस्ती विशेष अभियान’ राबविण्यात आले होते.  नागरिकांच्या सोईसाठी ही मुदत महिनाभर वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.  या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव
सात लाख पुणेकर होणार आगीपासून सुरक्षित पुणे : राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांचे अग्निशामक विभाग आणि जागतिक पातळीवर विना नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या सेफ किड्स फाउंडेशनने संयुक्तरीत्या शहरभरात आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला
‘अॅकॉर्ड’मध्ये अत्याधुनिक उपकरणांचे उद्घाटन पिंपरी : येथील अॅकॉर्ड एसडीएच हॉस्पिटलमध्ये युरो लेझर आणि न्युरो माइक्रास्कोप ही अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली असून, त्याचे उद्घाटन जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय लेले, उपाध्यक्ष जगदीश कदम आणि सुप्रसिद्ध युरोसर्जन डॉ. दीपक किरपेकर यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. या प्रकारच्या अद्ययावत यंत्रसामग्रीमुळे
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय पुणे : ‘मंत्रिमंडळाच्या १० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पिंपरी-चवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकरण, शिक्षणसंस्था वाहनांची संख्या तसेच गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language